जीवन असंच जगायचं असतं, रडता रडता हसायचं असतं
गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं, काट्यात सुध्दा हसायचं असतं;
रात रानी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,काळोखात ही फुलायचं असतं;
सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,हसुन हसुन हसायचं असतं;
बकुळी म्हणते,
सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;
मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;
कमळ म्हणतो,
संकटात चिखलात बुडायचं नसतं,संकटांना बुडवुन फुलायचं असतं
आयुष्य असच जगायचं असतं........
कुठून सुरु झालं हे माहित नसलं, तरी कुठे थांबायचं हे माहित असतं, आयुष्य
असच जगायचं असतं.
जे घडेल ते सहन करायचं असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं, आयुष्य असच
जगायचं असतं.
कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वतःच्या सुखापेक्षा
इतरांना सुखवायचं असतं, आयुष्य असच जगायचं असतं.
दुःख आणि अश्रुंना मनात कोंडून ठेवायचं असतं, हसता नाही आलं तरी हसवायचं
असतं, आयुष्य असच जगायचं असतं.
पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झेपावूनही धरतीला
विसरायचं नसतं, आयुष्य असच जगायचं असतं....