01 September, 2011

जिवन असेचं जगायचं.......

जिवन असेचं जगायचं...
कधी रडायचं तर कधी हसायचं
कधी रुसायचं तर कधी बोलायचं
जिवन असेचं जगायचं......
आभाळागत भरून यायचं पावसागत कोसळायच
...नदीगत वाहत जायचं समुद्रगत सामवून घ्यायचं
जिवन असेचं जगायचं......
फुलागत फुलायचं सुगंधागत दरवळत राहायचं
वाऱ्यासोबत फिरायचं माळरानावरती बागडायचं
जिवन असेचं जगायचं.....
समुद्रागत चिडायचं लाटेसारख धडकायचं
भरतीगत भरून यायचं ओहटीगत विसरून जायचं
जिवन असेचं जगायचं......
दलदलीत वाढायचं कमळवानी फुलायचं
डोळ्यात अश्रू साठवायचं चेहऱ्यावर हसू आणायचं
जिवन असेचं जगायचं.......

LoVE

To love is a Duty...
To be Loved is a Success..
To be with someone you love is a Achievement..
To be with someone who loves you is Life..