ते आईचं ओरडणं,
लाडाने बोलणं,
पक्षी दाखवत खाऊ घालणं,
डोळ्यांतून अश्रू येताच त्यांना पुसणं,
स्वत:ला दोष देऊन मुलांना हसत-खेळत ठेवणं.
असं वाटतं लहानपण कधी
पुढे जाऊच नये.
कधीतरी वाटतं नुसतं मोठं होण्याचं
स्वप्नच बघत रहावं
आणि....
ते स्वप्न कधी खरं झालं हे कळलचं नाही
उगाच मोठं होतो ना!
मोठं होऊन काय करतो?
ज्या आईने काळजाचं पाणी करून वाढवलं, शिकवलं.
संस्काराचे धडे दिले.
काय करतो आपण तिच्यासाठी?
बोलताना मात्र पटकन
बोलून जातो.
क्षणाचाही विचार करत नाही.
असं आपलं बोलणं, वागणं.
आठवलं की डोळ्यांतून अश्रू वाहतात.
आई म्हणजे काय?
आई एक दैवत
आई ही जन्मदाती
आई एक वरदान
आणि
देवाने मुलांना दिलेलं हेच
अनमोल दान...!!!