जीवनाच्या पावसाबरोबर येणारा.........
आयुष्याच्या पानावर विसावणारा............
काही क्षण विसावून ओघळून जाणारा........
दुसर्या थेंबाशी एकरूप होणारा............
कोवळ्या उन्हात मोत्यासारखा चमचमनारा..........
क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्यांना आनंद देणारा...........
अन जाता जाता अनेक क्षणांची आठवण ठेवून जाणारा......... !!!
........................................
तकाकणारी पाती
लवलवत्या कोंबांची
कोवळीशी नाती
पुन्हा एकदा हसऱ्या उन्हाचा घोट मला प्यायचाय
माझ्या पावसाळी मातीतला एक श्वास मला घ्यायचाय
तळव्यावर पसरलेली
हिरवीगार नक्षी
डोळ्यांमध्ये लपलेले
हसरे चिमणे पक्षी
पुन्हा एकदा जुईचा सुगंध मला ल्यायचाय
माझ्या पावसाळी मातीतला एक श्वास मला घ्यायचाय ...!!!
No comments:
Post a Comment